चंद्रपूर – शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची रविवारी बैठक पार पडली. येथील वंचित बहुजन आघाडी, उलगुलान संघटना, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या सभेला विरोध करीत सभागृहाबाहेर घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी अंदाजे १०० ते १५० जणांना ताब्यात घेतले व नंतर सुटका केली.
जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी, उलगुलान संघटना व भीम आर्मीकडून ही सभा उधळून लावण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले होते. तसे पोलिसांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले असून, त्यांची सभा तात्काळ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती. तसे न झाल्यास भिडे Bhide Guruji यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची रविवारी २३ जुलैला सकाळी बैठक सुरू झाल्याची माहिती होताच वंचित बहुजन आघाडी, उलगुलान संघटना,भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अग्रसेन भवन परिसरात जाऊन घोषणाबाजी करत भिडे यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी जवळपास १०० ते १५० जणांना ताब्यात घेतले व नंतर सुटका केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाकार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोड, जिल्हा महासचिव मधुकर उराडे, जिल्हा उपाध्यक्ष कपुरदास, दुपारे, विजू इंगोले, राहुल चौधरी,शहर अध्यक्ष बंडू ठेंगरे, शहर कार्याध्यक्ष सतिश खोब्रागडे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कविता गौरकार, शहर महिला आघाडी अध्यक्ष तनुजा रायपूरे, शहर महिला महासचिव मोनाली पाटील, महिला तालुकाध्यक्ष संध्याताई पेटकर, लता भीमलाल साव, सुलभा बंडूजी चांदेकर इंदूताई डोंगर, संघमित्रा मावलीकर,चंद्रप्रभा रामटेके,ललिता दुर्गे, ललिता गेडाम,इंदिरा खोब्रागडे, तृप्ती उराडे, शोभा नरवाडे, किरण खैरकार,ज्योती उंदीरवाडे, विद्या टेभरे, पुष्पलता कोटांगले, अविंता उके, शालू कांबळे, दमयंती तेलेंग, रिचा लोणारे, वैशाली साव, जिल्हा युवा महासचिव विशेष निमगडे, युवा शहर महासचिव हर्षवर्धन कोठारकर, नकुल कांबळे या सर्वाना अटक करण्यात आली.