पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे स्वतंत्र सर्व्हे करा…  अडेगाव येथील शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त तहसीलदारांना निवेदन..

888

गोंडपीपरी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. याच दरम्यान वर्धा व पैनगंगा नद्यांना पुर आल्याने पुराचे पाणी शेत शिवारात शिरून खरीप हंगामात लागवड केलेले संपूर्ण पीक पुराच्या पाण्याखाली आले. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पुराने नुकसान झालेल्या पिकांचे स्वतंत्र सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

नुकतेच गोंडपीपरी तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.गोंडपिपरी तालुक्याची मदार शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नातून अनेक कुटुंबाची उपजिविका चालत असते. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका शेतीला बसत असल्याने शेतकरी पुरता हादरला आहे. त्यामुळे शेती नेमकी करावी कशी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

मागील महिन्यात गोंडपीपरी तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाऊस कोसळला. अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान झाले याच दरम्यान वर्धा नदीला दोनदा पुर आल्याने खरीप हंगामात लागवड केलेले संपूर्ण पीक पाण्यात बुडले जमिन खरवडली.संबंधित तलाठ्याने पुरबुडी आणि अतीवृष्टी मुळे झालेल्या पिकाचे सर्व्हे करून एकत्रित यादी तयार केली. अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे कमी प्रमाणात नुकसान झाले त्या तुलनेत पुरामुळे अधिक प्रमाणात शेत पिकाचे नुकसान झाले.

अडेगाव परिसरात नुकसान झालेल्या शेतीचे जे सर्वे करण्यात आले. यात पूरबुडीमुळे नुकसान व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांचे सर्वे यादी एकत्रित तयार करण्यात आले. पुरामुळे शेतपिकाचे नुकसान तर झाले सोबतच काही व्यक्तीचे शेतजमीन खरवडली. त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान जास्त प्रमाणात झाले आहे. त्या तुलनेत अतिवृष्टीमुळे कमी प्रमाणात नुकसान झाले.

त्यामुळे पूरबुडी व जमीन खरबडून गेलेल्या शेतकऱ्यांना जास्त अनुदान मिळाला पाहिजे. मात्र सदर यादीमध्ये अति वृष्टी वाल्यांना जास्त व पूर बुडी वाल्या कमी क्षेत्र टाकल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अतिवृष्टी मुळे शेत पिकाचे नुकसान 30 ते 40 टक्के झाले आहे पण अतिवृष्टी च्या नावा खाली पूर बुडी वाल्याचे नुकसान अधिक झाले असल्याने स्वतंत्र सर्व्हे करण्याची निवेदनातून मागणी करण्यात आले आहे. निवेदन देतांना माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यासह नुकसान ग्रस्त शेतकरी विजय चौधरी, गणेश अंबादास चौधरी, बालाजी वसंत चौधरी, दुर्योधन यादव झाडे,अविनाश सुधाकर बट्टे उपस्थित होते.