नागरी -केळी-येवती -पवणी-माढेळी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खराब रस्त्यामुळे बससेवा बंद, विद्यार्थ्यांचे हाल रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करू:- अभिजित कुडे

193

वरोरा:-तालुक्यातील नागरी -केळी-येवती -पवणी-माढेळी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील पूल जर्जर झाले आहे. लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न पडला आहे. या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे या मार्गावरील बससेवा बंद झाली आहे, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या भागातील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. संबधित बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी झोपेत आहे यांना लोकांच्या जिवाची पर्वा नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतकी बिकट अवस्था असून देखील यांचे लक्ष नाही. पुलाच्या वर मोठे मोठे खड्डे पडलेले आहे, भेगा पडल्या आहेत तरी यांना जाग आली नाही कुणाचा जीव गेल्यावर यांना जाग येणार काय. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना कार्यपद्धती ने आंदोलन करण्यात येईल. बांधकाम विभाग निधी उपलब्ध नाही अश्या बोंबा मारत असते मग इतका पैसा जातो कुठे. एक दोन नाही तर संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांची हीच परिस्थिती आहे. लोकांच्या मनात प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला