आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

144

चंद्रपूर : शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हाकेला धावून जाणारे, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, तर आता विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणारे लोकप्रिय आमदार सुधाकर अडबाले यांचा वाढदिवस गुरुवारी विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

शिक्षक मतदार संघातील सहा जिल्ह्यांसह अन्‍य जिल्ह्यातूनही कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांच्या नवीन संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन मान्‍यवरांच्या हस्‍ते करण्यात आले. आमदार अडबाले यांनी आजवर केलेल्‍या कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन तसेच राष्ट्रपती पुरस्‍कार प्राप्‍त पुष्पा श्रावण पोडे (पुष्पा दत्तात्रय पाचभाई) यांचा अडबाले परिवाराच्या वतीने सत्‍कार करण्यात आला.

आमदार सुधाकर अडबाले यांना शुभेच्‍छा देण्यासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्वसामान्‍य नागरिकांसह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शैक्षणिक, सामाजिक तथा राजकीय मंडळींची रिघ लागली होती. नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. चंद्रपूरचे संचालक, कर्मचारी यांच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांचा शाल, पुष्प भेट व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. अशोक जीवतोडे, आमदार प्रतिभा धानोरकर, सुदर्शन निमकर, मनोहर पाऊणकर, चंद्रकांत गोहोकार, डॉ. आनंदराव अडबाले, नंदाताई अल्‍लूरवार, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, चंद्रकांत वासाडे, डॉ. चेतन खुटेमाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, विनायक धोटे, भाऊराव झाडे, दीपक जेऊरकर, विजय बदखल, डॉ. विनोद मुसळे, डॉ. सचिन धगडी, संतोष कुचनकर, सुधीर ठाकरे, डॉ. सौरभ राजुुरकर, मंगल बलकी, चंद्रपूर कृषी उत्‍पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य, उपसभापती गोविंदा पोडे, शिक्षणाधिकारी (माध्य) कल्‍पना चव्‍हाण, उपशिक्षणाधिकारी निकीता ठाकरे, डॉ. रूपेश ठाकरे, नंदू नागरकर, धनराज मुंगले, डॉ. विश्‍वास झाडे, टिकाराम काेंगरे, देवराव भोंगळे, पप्‍पू देशमुख, राहूल पावडे, विजय चंदावार, राहूल बालमवार, सुरेश चोपणे, संदीप सिडाम, विजय टोंगे, प्राचार्य श्‍याम धोपटे, विजय भोगेकर, जगदीश जुनघरी, लक्ष्मण धोबे, संजय पावडे, सुनीता लोढीया, अनिल मुसळे, दिनेश चोखारे, सचिन राजुरकर, उषा धांडे, देवानंद वाढई, कृष्णाजी नागपूरे, सुदर्शन बारापात्रे, सादिक शेख, डॉ. नियाज कुरेशी यांच्यासह विमाशि सं