मेरा माटी मेरा देश उपक्रम गरजूना साहित्य देऊन संपन्न निलेश राव ह्यांनी सेल कव्हर, वृक्ष कुंड्या व कुल जार देऊन ठेवला आदर्श

320

चंद्रपूर – स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपले आयुष्य अर्पणकेले त्यांना व ज्या सैनिकांनी स्वातंत्र्यत्तोतर आमच्या भारत मातेच्या रक्षणार्थ जीवदान दिले त्या जाबांज जवानाना दिवेलावून मूक श्रद्धांजली अर्पण करुन विक लांग सेवा संस्था पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी विनम्र आदरांजली, अभिवादन केले.
चंद्रपूर विजकेंद्राचे कर्मचारी श्री नितीन राव ह्यांनी ह्या प्रसंगी पावसाळ्यापासून मोबाईल संरक्षण स्वरूपात 51सेलकव्हर वितरित केले तसेच दिव्यांग हितार्थ धडपडणाऱ्या विकलांग संस्थेला कुलजार व वृक्ष कुंड्या उपलब्ध करुन दिल्यात.. या बद्दल श्री राव ह्यांना स्वयंसिध्द माहिला बचत गट पदाधिकारी सौं. राजश्री शिंदे व सौं, सीमा दुपारे ह्यांनी शाल श्रीफळं भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
कार्यक्रमाला श्री देवराव कोंडेकर, अशोक खाडे, प्रसाद पा न्हेरकर, पूजा राखोंडे, पूजा चहारे, सीमा दुपारे शिवानी बोबडे ह्यांनी उपस्थिती दर्शवीली.
भारत माता कीं जय घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.