झाडबोरी येथे वाघाच्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार

348

सावरगाव : तळोधी वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गिरगाव गट ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या झाडबोरी येथील गावाशेजारी चरत असलेल्या दोन शेळ्यांवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवारी घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार वाघाच्या हल्ल्यात ग्रामीण भागातील पाळीव प्राणी ठार होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ठार झालेल्या शेळ्या आशक शेख व मनोहर राऊत यांच्या मालकीच्या होत्या. वनविभागाने तत्काळ मदत द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.