गडचांदूर-प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे प्रथम वर्ष बीए, च्या विद्यार्थ्यांची फ्रेशर पार्टी उत्साहात पार पडली.
महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांना संबोधताना ते म्हणाले की पदवीचे शिक्षण घेताना स्टेज डेअरिंग, कौशल्य विकास इत्यादींवर भर देणे आवश्यक आहे. नवनवीन ज्ञान आत्मसात करा, वाचन करा ज्याचा तुम्हाला करिअर मध्ये फायदा होईल. संभाषण कौशल्य वाढवा. लायब्ररीचा पुरेपुर उपयोग करा. महाविद्यालयामध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमा मध्ये सहभाग घ्याविध्यार्थी हा म्हविद्यालायच्या प्रगतीचा आधारभूत घटक असतो असे त्यांनी प्रतिपादन केले.सदर कार्यक्रमात पुष्प देऊन प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, ड्रामा, एक मिनिट गेम, बलून गेम इत्यादीचा समावेश होता. मिस्टर फ्रेशर व मिस फ्रेशर हि स्पर्धा घेतली गेली.या स्पर्धेमध्ये मिस्टर फ्रेशर वैभव ताजने व मिस साक्षी गोहकार यांची निवड झाली.सदर कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष मा.अरविंद मुसने यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनात आपले ध्येय निश्चित करावे.व धेयपूर्तीसाठी जिद्द,चिकाटी व कठोर मेहनत करावी.महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांच्या कार्यपूर्ती साठी तत्पर राहील असे मनोगत व्यक्त केले.तर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आपल्या आजपर्यन्तच्या जडणघडण विषयी आपले मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा चिंचोलकर, तर आभार प्रांजली देवतळे हिने मानले. कार्यक्रमाचे कामकाज सांस्कृतिक प्रमुख प्रा. एजाज शेख,प्रा.मनीषा मरसकोल्हे यांनी पाहिले. सदर कार्यक्रमास मा.अरविंद मुसने, प्राचार्य नानेश्वर धोटे, प्रा.राहुल ठोंबरे,प्रा.सचिन पवार,प्रा.रोशनी खाते,प्रा.श्रीकांत घोरपडे,प्रा.सचिन धनवलकर,प्रतीक मून,गजानन रामभारती उपस्थित होते.