गोंडपिपरी: दि.६ ऑक्टो.२०२३,गडचिरोली जिल्ह्यातिल सुरजागड येथून लोहखनिजाचा कच्चा मालाची मोठ्या प्रमाणात जड वाहनाने वाहतूक अहेरी-चंद्रपूर या राष्ट्रीय मार्गावर सुरू आहे.गोंडपीपरी येथून दिवसरात्र हजारोच्या संख्येने जडवाहनाची वाहतूक सुरू असल्याने व पार्किंगची सुविधा नसतांना सुद्धा रस्त्यावरच शेकडो वाहन थांबवुन ठेवत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.वाहनाच्या धडकेत अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे वाहतुक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या हायवा वाहने हटवण्यात यावे अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी कदम तथा ठाणेदार जीवन राजगुरू यांना निवेदना मार्फत देण्यात आली.
अहेरी – चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरजागढ लोहखनिज साठी खाजगी वाहनाची दिवसरात्र वाहतूक सुरू आहे. हजारोच्या संख्येने वाहनांची रेलचेल सुरू असताना मार्गावर कुठल्याच प्रकारच्या पार्किंगची सुविधा नाही. अशावेळी राष्ट्रीय महामार्ग स्वतःच्या मालकीचा समजत रस्त्यावर शेकडो वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात आहे. महामार्गच जणूकाही खासगी वाहतूकदारांनी आपल्या ताब्यात घेतला असून, या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघाताच्या घटनाही घडत आहे.यापूर्वी सुद्धा अहेरीकडून येणाऱ्या वाहनाच्या धडकेत अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे या माध्यमातून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. भविष्यात जीवघेणी घटना घडू नये, याकरिता ती जीवघेणी वाहने हटवा व त्यांचे वर कारवाई करा असे निवेदन गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुक्याचे तहसीलदार व ठाणेदार यांना देण्यात आले.
दरम्यान तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, युवक अध्यक्ष विपिन पेद्दुलवार, बा.स.संचालक अशोक रेचनकर,संतोष बंडावार, अनु.जा.ज.माजी अध्यक्ष गौतम झाडे, श्रीनिवास कंदनुरिवार, नगरसेविका वनिता वाघाडे, विनोद नागापुरे, राजू झाडे, अभय शेंडे, नारायण पेंदोर, बालाजी चणकापुरे, हरिचंद्र मडावी, माधव लडके,विपिन मोरे, मनोज नागापुरे, अनिल कोरडे, अखिल गजेडीवार, शंकर येलमुले, शुभम पिंपळकर, जितेंद्र गोहणे,सुरेश आमणे, अनिकेत आमणे, दीपक पिद्दुरकर आदींची उपस्थिती होती.