नवभारत विद्यालय, राजोली येथे ‘वन्यजीव सप्ताह’ अंतर्गत ‘जैवविविधता’ विषयीची कार्यशाळा संपन्न

438

राजुरा: दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा करण्यात येतो.या निमित्ताने दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी पर्यावरणस्नेही संस्था ‘बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ तर्फे नवभारत विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, राजोली येथे ‘जैवविविधता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी बी.एन.एच.एस.चे मार्गदर्शक श्री सौरभ दंदे सर यांनी विद्यार्थ्यांना जैवविविधता याविषयी मार्गदर्शन केले.त्यांनी जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधतेचे पर्यावरणातील महत्त्व. याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य माननीय सुधाकर एस.पुराम सर ,पर्यावरण शिक्षक श्री ईश्वर टांगले,बी.एच.एन.एस.चे श्री चरणजी शेंडे, पर्यावरण दूत शहेबाज पठाण, कुमारी नम्रता लाकडे व इयत्ता नववीतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.