आनंद निकेतन महविद्यालय येथील समाजशास्त्र विभागव्दारे व्यसनमुक्ती व वृध्दाश्रमला भेट.

408

वरोरा : ८ आँक्टोबर २०२३ महारोगी सेवा समिती, आनंदवन द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलग्नीत. आनंद निकेतन कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आनंदवन वरोरा. येथील समाजशास्त्र विभागात व्दारा आयोजित शैक्षणिक संस्था भेट काढण्यात आली सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे त्यांच्या नियोजना अंतर्गत काढण्यात आली. दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी “झेप नई दिशा व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, चंद्रपूर”. भेट देण्यात आली यात श्री. पिंपळकर यांनी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे ओळख व दिनचर्या आणि रुग्णांचा सोई सुविधाचा आढावा दिला.  या व्यसन मुक्ती उपचार केंद्राचे ज्येष्ठ पदाधिकारी  अध्यात्मिक अभ्यासात श्री.भावे. यांनी कोणताही व्यसनावर नियंत्रण अथवा कायमचा उपाय आणण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ध्यान असतो. व्यसनअसलेल्या रुग्णांनी आपल्या वयानुसार त्याचवेळी अंतर्गत रोजी ध्यान करणे आवश्यक आहेत व ध्यानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. नंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यावर प्रश्न विचारले. महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ रंजना लाड. यांनी व्यसनमुक्ती मधील रुग्णांना त्यांच्या समस्या उदय निराकरण सांगत असताना मनुष्य हा स्वतःहून व्यसनाकडे वळत नसतो तर परिस्थिती त्याला करून घेते. व व्यसनमुक्ती केंद्रातील संचालक मंडळाचे, 1992 पासून व्यसनमुक्तीसाठी ते कार्यरत आहेत. व अशा रुग्णांसाठी ते सदैव धडपडत आहेत याकरिता सर्व संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले. व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वय श्री मारुती साव त्यांनी व्यसनाधीन रुग्ण म्हणून ते व्यसनमुक्ती पर्यंतचा आपले मत व्यक्त केले. व आभार प्रदर्शन म्हणून महाविद्यालयाचा एम ए भाग १ चार विद्यार्थी शुभम आमने यांनी आभार मानले. यावेळी झेप नई दिशा व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, चंद्रपूर येथील प्रकल्प संचालक डॉ. एस एस पालीवाल, प्रकल्प समन्वय श्री मारुती साव, महिलापियर एज्युकेटर सौ गीता पालीवाल, वार्ड बाँय श्री गजानन नेवारे, श्री विश्वेश्वर पवार, श्री राजू चिंचोलकर, श्री विनोद दिंडे, सामाजिक कार्यकर्ता श्री देवेंद्र पिंपळकर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर श्री. डेबुजी बहुउद्देशीय विकास संस्था चंद्रपूर द्वारा संचालित डेबु सावली वृद्धाश्रम येथे शैक्षणिक भेट देण्यात आली यात संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष शिंदे. यांनी वृद्धाश्रमाची स्थापना व संपूर्ण आढावा वृद्धांचा सोयी सुविधा व वृद्धाश्रमाची संपूर्ण पाहणी व शहानिशा करून दिली, नंतर त्यांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद सातपुते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना कुटुंबातील वृद्ध व्यक्तीवर वाढत्या ताणतणामुळे समाजामध्ये वृद्धाश्रम अस्तित्वात आलेले आहेत. होत्या म्हणजे सर्व कारणे विद्यार्थ्यांना, आश्रमातील सर्व व्यक्तींना माहिती स्वरूपात सांगितली. यावेळी डेबू सावली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष शिंदे, उपाध्यक्ष सहदेव राऊत, सचिव पन्नालाल चौधरी, सहसचिव भारती शिंदे, कोषाध्यक्ष सौ स्नेहल भोस्कर, सदस्य जयश्री राऊत, शंकर भोजेकर. यावेळी महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ रंजना लाड, प्रा. प्रमोद सातपुते, प्रा. हर्षल चौधरी, व समाजशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.