राजुरा: विभाग स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत बामणवाडा-राजुरा येथील स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूची राज्य स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेकरिता निवड
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद वतीने, विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत शाळेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कु. आयुष्य रामकृष्ण पिपरे याने 80 मिटर हर्डल्स मध्ये प्रथम व उंच उडी मध्ये तृतीय क्रमांक पटकावला याची बल्लारपूर (विसापूर) येथे दिनांक 29 ते 2 आक्टोबर पासून होणाऱ्या राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेत नागपूर विभागाच प्रतिनिधित्व करणार आहे.
या खेळाडूला शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री भास्कर फरकाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर प्रभा डि. एम. संस्थेच्या सचिव सिस्टर रिता डि. एम. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी श्री संदिप उईके सर,श्री. विजय ढोबाळे सर, श्री पंधराम सर, अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव श्री सुरेश अडपेवार सर, शाळेचे सर्व शिक्षक वृंध व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व भविष्यात ही अशीच कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या.