गडचांदूर-खेळणे-बाळगणे हे मुलांच्या आवडीचे क्षेत्र आहे.यातच योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले करियर देखील घडू शकते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व आहे.खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासात भर पडून तो निडर होत असतो.असे प्रतिपादन प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथील विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमानपत्र वितरण कार्यक्रमात मा.अरुण डोहे यांनी आपल्या प्रमुख अतिथी पर भाषणातून व्यक्त केले.प्रेरणा महाविद्यालयातील विध्यार्थी 30 व 31 ऑक्टोबर दरम्यान आयोजित कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेक येथील विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धेत कबड्डी या खेळात जालना या संघाला पराभूत करून आपला विजय प्राप्त केला.सदर संघाने उपांत्यपूर्व फेरी पर्यंत मजल मारली.तसेच रनिंग या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश प्राप्त केले.सदर कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नामदेवराव ठेंगणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना झपाट्याने शहरीकरण होणाऱ्या नगरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप कमी मैदाने उपलब्ध असल्याचे आपल्याला आढळून येतात.जर मुलांचा सर्वांगीण विकास हवा असेल तर त्यासाठी मुलांची दैनंदिन जीवनात शारीरिक सक्रियता असणे खूप महत्वाचे आहे.असे मत व्यक्त केले.तर प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी आज देशाला जर आत्मनिर्भर आणि सक्षम नागरिक हवा असेल तर विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच शारीरिक शिक्षणाचे धडे दिले पाहिजे.जेंव्हा शारीरिक क्षमतेचा विकास होईल तेव्हा विद्यार्थ्यांच्या बौध्दिकतेतही वाढ होईल. असे प्रतिपादन केले.सदर कार्यक्रमाला मा.नामदेव ठेंगणे सर,अरविंद डोहे सर,संतोष लोहे सर,प्रा.एजाज शेख, प्रा. राहुल ठोंबरे प्रा.सचिन पवार,प्रा.मनीषा मरसकोल्हे उपस्थित होते.सदर विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा.राहुल ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पवार,संचालन अपूर्वा वाघमारे हिने तर आभार प्रतीक्षा चिंचोलकर हिने केले.