विवाह पूर्व समुपदेशन काळाची गरज या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न 

191

होप फॉउंडेशन सिरोंचा आणि एस. आर. एम.कॉलेज ऑफ सोशल वर्क , चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विवाह पूर्व समुपदेशन काळाची गरज’ या विषयावर आभासी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

     यावेळी मार्गदर्शक म्हणून स्वयंभू समुपदेशन केंद्राचे समुपदेशक सोनाली गवारगूर -वांढरे उपस्थित होत्या. तर आयोजक म्हणून होप फॉउंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष नागेश मादेशी, एस. आर. एम कॉलेज ऑफ सोशल चंद्रपूर चे प्राध्यापक डॉ. जयश्री कापसे -गावंडे, प्रा.डॉ. देवेंद्र बोरकुटे , समुपदेशक धनंजय तावाडे उपस्थित होते.

       समुपदेशक सोनाली गवारगूर यांनी विवाह म्हणजे काय, त्याचे उद्देश, गरज याबद्दल माहिती देऊन विवाह करताना कोणत्या कोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे, विवाहपूर्व समुपदेशन व त्याचे महत्व तसेच आजच्या काळात त्याची असलेली गरज याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

 यावेळी एकूण 65 प्रेक्षक आभासी पद्धतीने उपस्थित होते.प्रश्नोत्तरे यातून शंका निरसन करण्यात आले.  सूत्रसंचालन स्वप्नील मेश्राम यांनी तर प्रास्ताविक होप फॉउंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष नागेश मादेशी तर आभार प्रदर्शन माधवी रामूलू मादेशी यांनी केले.