जिवती (ता.प्र.) : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुका कधी सीमावाद तर कधी जमिनीच्या रेकॉर्डसंबंधी वादामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे.अतिशय दुर्गम भागात असलेल्या या तालुक्याला नैसर्गिक वारसा तर लभालाच आहे.सोबत समृद्ध असा सांस्कृतिक आणि एतीहासिक वारसाही लाभलेला आहे.प्राचीन इतिहासाच्या अनेक पाऊलखुणाही येथे आहेत.येथील आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांनी या तालुक्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.याच संस्कृती आणि ईतिहासाचे धागेदोरे शोधणारी, जिवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवार लिखित-दिग्दर्शित डॉक्युमेंट – ड्रामा फिल्म ‘द लॉस्ट पॅराडाईज ‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘ चुनाव’ या त्यांच्या यापूर्वीच्या लघुपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्याच टीमला घेऊन ते ‘ द लॉस्ट पॅराडाइज ‘ या फिल्मची निर्मिती करीत आहेत. ‘चूनाव प्रमाणे या फिल्ममध्येदेखील पूर्णपणे स्थानिक लोकांनी अभिनय केला आहे.तहसीलदार अविनाश शेंबटवाड,यांनी नेहमी आपल्या स्थानिक लोकांना कलाकार म्हणून घेण्यास प्राद्यान दिले आहे.ज्यांना अभिनयाची कुठलीही पार्श्वभुमी ,,, आशा सामान्य लोकांना घेऊन बनवलेल्या त्यांच्या फिल्म कदाचित याच कारणामुळे वेगळ्या ठरतात.संपूर्ण चित्रीकरण जिवती तालुक्यातच झाल आहे.त्यासाठी संपूर्ण टीम दिवाळीदरम्यान दहा दिवस जिवतीत वास्तव्यास होती.
जिवतीमधील वेग वेगळ्या ठिकाणी या फिल्मचे चित्रीकरण झाले आहे.महापांढरणी या गावात संपूर्ण टीम वास्तव्यास होती.अतिशय दुर्गम आणि जोखिमच्या ठिकाणी या फिल्मचे चित्रीकरण झाले आहे.त्यापैकी शंकरलोदी येथील एतीहासिक कपिलाईच्या भुयारातही चित्रीकरण करण्यात आले.
चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन जिवातीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी केले आहे. छायंकन अजय घाडगे,सहायक छायाचित्रकार गार्गी भोसले,प्रणय भोयर,धनुष राठोड, प्रोडक्शन मॅनेजर विराज,संगीत तन्मय संचेती,संकलन अर्थव मुळे,ध्वनी अजिंक्य जूमले यांनी केले आहे.यासोबतच चित्रपटात कलावंतही चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहेत.लवकरच ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.