गोंडपिपरी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेत बसलेल्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळ यांनी विरोधी संचालकांना विश्वासात न घेता अनेक अनागोंदी कारभार करून भाजपा पक्षाचा प्रचार व प्रसार करणे हेतूने बाजार समितीची लूट चालवली आहे.
मागील सप्टेंबर महिन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पैशातून ठराविक नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर राबवून भाजपा पक्षाचा प्रचार करण्याचा प्रयत्न या सत्ताधारी सभापती, उपसभापती व संचालक मंडळाकडून झाला होता. पुन्हा एकदा २०२४ नवीन वर्षाचे (कॅलेंडर )दिनदर्शिका प्रसारित करणे हेतूने संबंधित विरोधी संचालकांना विश्वासात न घेता सत्ताधारी संचालकांनी भाजपा पक्षाचा प्रचार झाला पाहिजे अशी नवीन वर्षाची दिनदर्शिका बनवली आहे आणि ती दिनदर्शिका बघताच हे सर्व लक्षात येईल. सोबतच विरोधी संचालकांची नावे दिनदर्शिकेत लिहिताना राजशिष्टाचार पाडला गेला नाही.
वरिष्ठ नेत्यांची फोटो उजव्या बाजूला लावलेली असून सन्माननीय स्थानिक आमदार साहेबांचा यात फोटो सुद्धा टाकला गेला नाही. यासह दिनदर्शिकेत छापण्यात आलेला मजकूर व फोटोशी आम्हा ६ संचालकांची संमती नसताना आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी असलेली एकनिष्ठता मलीन करण्याच्या उद्देशाने त्या दिनदर्शिकेवर आमची नावे परस्पर हेतूने भारतीय जनता पार्टीच्या व पार्टीशी गटबंधनात असलेल्या नेत्यांच्या खाली टाकण्यात आलेली आहे. करिता आम्ही सहा संचालक व गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटी कडून आज दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता गोंडपिपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सदर सुडबुद्धीने बनविलेल्या २०२४ नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेची होळी करणार आहोत.असे सदर निवेदनात म्हटले आहे.
यासह बाजार समितीचे विद्यमान सभापती उपसभापती यांनी कोणत्याही प्रकारच्या शेती निगडित व शेतकऱ्यांच्या योजना न राबविता आरोग्य शिबिर,दिनदर्शिका, दैनंदिनी डायरी व इतर बाबीवर खर्च करून भारतीय जनता पार्टीचा प्रचार व प्रसिद्धी करण्याचा मनमानी कारभार होत असल्याचे निदर्शनास येते. करिता बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांचे वर संबंधित विभागांनी कारवाई करावी. असे निवेदन माजी उपसभापती, तथा ६ संचालक मंडळ व तालुका काँग्रेस कमिटी कडून सहकारी संस्थेच्या सहाय्यक उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष तथा संचालक निलेश संगमवार, माजी उपसभापती तथा विद्यमान संचालक अशोक रेचनकर, संचालक देविदास सातपुते, संचालक संतोष बंडावार, संचालक नारायण वागदरकर, माजी संचालक शंभूजी येलेकर, तालुका काँग्रेसच्या अनुसूचित जा.ज. विभागाचे माजी अध्यक्ष गौतम झाडे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नितेश मेश्राम, काँग्रेस नेते सारनाथ बक्षी उपस्थित होते.