गडचांदूर: सावित्रीबाई फुले यांनी रूढी, परंपरांची जोखंडे नाकारून समाजाला अज्ञानातून मुक्त करण्याचे काम केले.महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या विचारांचा वारसा सावित्रीबाईंनी प्राणपणाने जपला होता.आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी फुले दांपत्याने केली आहे.सावित्रीबाई या पहिल्या कृतीशील महिला समाज सुधारक आहेत असे मत प्राचार्य ज्ञानेश्वर धोटे यांनी व्यक्त केले.ते प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात बोलत होते.
तत्कालीन समाजाला हादरून सोडणारे सुधारणेचे काम फुले दाम्पत्यांनी केले. मुलीसाठी शाळा,बहुजन दलितांसाठी पाण्याचा हौद खुला करणे, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करणे यासारख्या कार्यांचा आढावा त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून घेतला. तर कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून प्रा. इजाज शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.अध्यक्षस्थानी प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर धोटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. अरविंद मुसने सर,प्रा. मनिषा मरसकोल्हे,प्रा.इजाज शेख ,प्रा.राहुल ठोंबरे,रोशनी खाटे उपस्थित होते. अतिथी भाषानातून मा.अरविंद मुसने सर यांनी आजच्या तरुणा पुढील आव्हाने आणि सावित्रीबाई महात्मा फुले यांच्या कार्याची आवश्यकता बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर प्राध्यापिका मनीषा मरस्कोल्हे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन आजच्या युगात शिक्षणाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमात महाविद्यालतील विध्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून आल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन कु. भाग्यश्री दूधकोर हिने,तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी क्षीरसागर हिने केले.