माळी समाज, बौद्ध समाज यांच्या वतीने ” सावित्रीमाई फुले जयंती साजरी

287

घोसरी :- मौजा – घोसरी ता. जि. चंद्रपूर येथे माळी समाज भवन तसेच पंचशील नगर येथील बौद्ध समाज भवन येथे सावित्रीमाई फुले 192 वी जयंती साजरी करण्यात आली.

माळी समाज भवन येथील जयंती उत्सवाला घोसरी ग्रामपंचायत च्या सरपंच सौं. रोषणाताई लोळे, अध्यक्ष म्हणून लाभल्या त्याचप्रमाणे उद्घाटक म्हणून माजी सभापती ललिता ताई पोरटे, दीप प्रज्वलन ग्रामपंचायत सदस्य प्रशांत झाडे, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य आकाश वडपल्लीवार, हेमाताई सिडाम, दुर्गाताई लोणबले, पोलीस पाटील छत्रपती कोहपरे, तसेचत. मु. स. अध्यक्ष सुधाकर चुदरी, नानाजी चुदरी, रोजगार सेवक सुरेश पाल, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर वाकुडकर, अजय वडपल्लीवार, तसेच ग्राम संघाच्या सर्व महिला सदस्य, बचत गटाच्या सर्व महिला सदस्य, व गावातील सर्व माळी समाज बांधव उपस्थित होते, प्रामुख्याने महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, वर्ग तिसऱ्या वर्गाची चिमुकली कु. रिद्धी आलेवार ह्या चिमुकलीने सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर अत्यंत सुंदर विचार मांडले, या कार्यक्रम यशस्वीतेसाठी माळी समाज अध्यक्ष, भाऊराव निकुरे, सचिव, राजू लोणबले, साईनाथ लोणबुले, बळवंत निकुरे सुरेश शेंडे, रवींद्र निकुरे,नानाजी निकुरे, विश्वनाथ लोणबले,हरिदास लोनबले, शंकर मोहुर्ले, तसेच छाया निकुरे,छाया शेंडे,इंदिरा निकुरे, वर्षा मोहुर्ले, मनीषा लोणबले, इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी केला,