सावली तालुक्यातील मोखाळा येथे आज दिनांक ११मे ला मध्यरात्री च्या दरम्यान जितेंद्र तुरविले यांचे राहते घराला लागुन असलेल्या झोपडीला अचानक आग लागल्याने आगीचा भडका उडाला व झोपडीला लागुन असलेल्या बाबुराव भोयर यांच्या तनसीच्या ढिगाऱ्याला आग लागली आणि आगीने रुद्रारुप धारण केले.
तोच उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाहेर झोपून असलेल्या जितेंद्र तुरविले यांना जाग आली आणि त्याने आरडाओरड केली. त्यानंतर घराशेजारी असलेल्या लोकांनी आग लागलेल्या ठिकाणी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि या घटनेची माहिती पोलिस स्टेशन सावली व अग्निशमन दल यांना दिले. घटनेची माहिती मिळताच संमधीत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणले.
गावकऱ्यांनी वेळीच धावपळ करून आग आटोक्यात आणण्यास मदत केल्याने होणारी मोठी घटना टळली. या मध्ये जीवितहानी झाली नसली तरी झोपडी व तनसीचा ढिगारा जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.