गोंडपिंपरी: दलित मित्र वि. तु. नागपुरे डी. एड. कॉलेज गोंडपिपरी येथे दिनांक 12/5/2024 रोजी माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता.2005-2006 व 2007-2008 बॅच च्या छत्राध्यापकांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरवात सकाळी 11 वाजता दिप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर दलित मित्र वि. तु. नागपुरे कॉलेजच्या प्राचार्या स्वर्गीय तळवेकर मॅडम व वर्गमित्र स्व. मिलींद वेलेकर, स्व.रुपेश सत्रे, स्व. सुरेश डूडूरे, स्व. सचिन नारनवरे, स्व. श्रीकांत राऊत व स्व. शीतल चाहारे यांना श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर प्राचार्य, प्राध्यापक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. अनेक छात्राध्यापकांनी आपले मनोगत व अनुभव सांगितले जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. या कार्यक्रमाचे नियोजन स्वप्नील कच्छेवार, तानाजी घाटे, अमोल कुत्तरमारे, वंदना हनवते, अजय देवतळे व इतर विद्यार्थ्यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दलित मित्र वि. तु. नागपुरे डी. एड. कॉलेजच्या प्राचार्या सरोदे मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे प्राचार्य श्री बामनकर सर एल.के. जे.ज्युनियर महाविद्यालय गोंडपिपरी, प्राचार्या हिरादेवे मॅडम विवेकानंद महाविद्यालय बेंबाळ, प्रा. खामणकर सर, प्रा. गजभिये सर, प्रा. वासाडे सर, प्राध्य. कामडी सर, प्रा. चंदेल मॅडम, प्रा. धर्माधिकारी मॅडम,प्रा. खोब्रागडे सर जनता कनिष्ठ महाविद्यालय कोठारी,प्रा. कारडवार मॅडम, गौरकार बाबूजी, राहुल गिरसावळे, आनंदा झाडे, सुधाकर वडस्कर यांची ही कार्यक्रमाला उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन रवींद्र अवथरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी बरडे यांनी केले.