सावली – डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक मिशन सन २०२४-२५ अंतर्गत साईश्रेया फार्मर प्रो कंपनी चकपिरंजी अंतर्गत दोन गटाचे गावपातळी वरील शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. प्रीती हिरळकर प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर, श्री पानसे मंडळ कृषी अधिकारी सावली, सौ अल्का स्वामी सी इ ओ साईश्रेया फार्मर प्रो क चकपिरंजी, श्री अनिल स्वामी संचालक साईश्रेया फार्मर प्रो क चकपिरंजी, श्री फुलझेले व्यवस्थापक महाबीज हे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सेंद्रिय शेती हे
काळाची गरज असून आपल्याला सेंद्रीय खताचा आणि सुपीक जमिनीचा किती लाभ होणार आहे याचे महत्व सांगून प्रात्यक्षिक १० ड्रम थेरी चे वापर करून शेतकरी यांनी सेंद्रिय शेती करायला पाहिजे असे प्रतिपादन प्रकल्प संचालक चंद्रपूर यांनी केले श्री पानसे यांनी केले. तर प्रात्यक्षिक दशपर्णी, जीवाअमृत, बिजामृत १० ड्रम थेरी बाबत माहिती सांगण्यात आले. त्या नंत मेटाराईझम या बाबत श्री हताझाडे यांनी प्रात्याक्षिक करून दाखविले तसेच सदर कार्यक्रमात जैविक निविष्ठा केंद्र, गट व कंपनी स्थापने याबाबत माहिती, माती परीक्षण, PDNSM² योजना बाबत माहित श्री कावळे बीटीएम यांनी समजावून सांगितले.