चंद्रपूर:लालपेठ येथील वन विभागाच्या खड्ड्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तनविर शेख (१६) या मुलाचा बुडून मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे. दुर्गापूर येथील रहिवासी असलेला तनवीर शेख हा मित्र आर्यन साईनाथ यलगमवार (१६)रा. दादमहल, कृष्णा जितेंद्रकुमार साहू (१६)रा. भिवापूर व सकलेन हमीद खान पठाण (२९), भिवापूर यांच्यासह दुचाकीने बल्लारपूर बायपास मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील लालपेठ कोळसा खाण कडे जाणाऱ्या मार्गावरील बंकर जवळील वन विभागाच्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते. तनविर सोबत आर्यन व कृष्णा हे दोघे त्या खड्ड्य उतरले, मात्र सकलेन ने त्यांना खड्ड्यात जाऊ नका असे सांगितले होते. खड्ड्यात पोहत असताना तनवीर याचा बुडून मृत्यू झाला. तर इतर दोघे बचावले. मुलाच्या मृत्युने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी गर्दी केली. मुलाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पथक पाचारण केले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.