बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : जिवती तालुक्याला जोडणारा गदचांदुर – माणिकगड पहाड- नगराळामार्गे जिवती हा मार्ग कमी अंतराचा असलेला व वळणदार घाटाचा आहे.तालुक्यातील नागरिकांना दळण वळनाच्यादृष्टीने माणिकगड घाटातील वळणदार रस्त्याचे सिमेंट काँक्रिटकरण केले जात आहे. मात्र कंत्रादारांकडून वळणदार घाटात फक्त गिट्टी टाकून बाकीचे काम मागील दोन हप्त्यापासून काम बंद ठेवले असल्यामुळे या मार्गाने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
परिणामी अपघाताची शक्यता ओढवली असून संबंधित अधिकारी व विभागाने या गंबिर बाबीला गांभीर्याने दखल घेऊन सदर काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
माणिकगड पहाडावरील विविध कामांसाठी गडचांदुर जाण्यासाठी जिवती – नगराळा – माणिकगड पहाड- गडचांदुर हा मार्ग कमी अंतराचा असल्याने या मार्गावर सर्वाधिक गर्दी असते माणिकगड घाटात वळणदार रस्त्याचे ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे सुरू असलेले काम मागील दोन हप्त्यांपासून बंद असल्याने त्या मार्गाने दमकोंडी व जिवमुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. रस्त्यावर नुस्ती गिट्टी टाकून ठेवली असल्याने दुचाकी वाहन चालवणे कठीण जाते आहे.फक्त दुचाकी जाईल,एवढी जागा शिल्लक आहे.समोरून दुसरी वाहन आली तर,त्या गिट्टीवरूनच दुचाकी टाकल्याशिवाय पर्याय नाही.याच ठिकाणी दुचाकीचे अपघात झाले आहेत.सुदैवाने काही जीवितहानी झालेली नाही.
सदर मार्गावरील वळणदार घाटात काही प्रमाणत एका बाजूने सिमेंट काँक्रिटीकरनाचे काम झाले आहे.दुसऱ्या बाजूला खोदकाम करून गिट्टी टाकून ठेवण्यात आली आहे.
तसेच सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम झालेल्या समोरच्या ठिकाणीही फक्त गिट्टी टाकून ठेवण्यात आली.यास जवळपास दोन आठवड्याचा कालावधी लोटून गेला,मात्र संबंधीत कंत्रादारांकडून कामास सुरुवात केली नाही. ठप झालेले सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करून होणारी वाहतुकीची कोंडी सुरळीत करावी.अशी मागणी केली जात आहे.