गोंडपिपरी:अगणित वृक्षतोड,रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वृक्षाची कत्तल, आगीमुळे वन संपदेची होणारी नुकसान यासह विविध कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे .
पर्यावरण समतोल टीकविण्यासाठी वनविभाग तसेच विविध संस्था तथा शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. सध्या पावसाळ्याचे दिवसाला सुरवात होत असल्याने या दिवसात वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन व संवर्धन करणे सोयीचे ठरत असल्याने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन निसर्ग सखा संस्था गोंडपिपरी च्या पुढाकाराने गोंडपीपरीं शहरात रोपवाटपचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शहरातील नागरिकांना जांब , आंबा, गोड लिंबु, सीताफळ, फणस, जांभूळ, मुगणी , चिकू, गजलिंबु यासह विविध जातीचे तब्बल शेकडो रोपाचे वाटप करण्यात आले. यावेळी निसर्ग सखा संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष दीपक वाढरे, चिंतामणी आर्ट्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.मोहन गिरिया, ज्येष्ठ पत्रकार अरुण वासलवार,काँग्रेस पार्टी सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे,भास्कर बट्टे,निलेश सातपुते, निसर्ग सखा संस्थेचे व्यवस्थापक अश्विनी वांढरे, आशिष ऊराडे,शामराव वागदकर, संदीप सरवर, नेमाजी घोगरे,यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.