लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच ठप्प पडलेल्या विकास कामांचा ब्रम्हपूरी विधानसभा झंझावात सुरू झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातुन मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले आहे.
त्यामध्ये ब्रम्हपूरी तालुक्यातील उदापुर, बरडकिन्ही, चिचगाव, डोर्ली, आवळगाव या गावांचा समावेश आहे.
उदापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी २२ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजन, बरडकीन्ही येथे खनिज विकास निधी अंतर्गत ५० लाख रुपयांच्या रस्ता बांधकाम, मनरेगा अंतर्गत २५ लाख रुपयांच्या रस्ता बांधकाम भुमीपुजन, चिचगाव येथे खनिज विकास निधी अंतर्गत ३५ लाख रुपयांच्या निधीतून गावातील रस्त्याचे फेरडांबरीकरण व मनरेगा अंतर्गत २५ लाख रुपये निधीतून रस्ता बांधकाम भुमीपुजन, डोर्ली येथे खनिज विकास निधी अंतर्गत गावात जाणाऱ्या रस्त्याचे फेरडांबरीकरण भुमीपुजन, आवळगाव येथे रामाजी नरुले ते रविंद्र चिलबुले यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम, दिलीप खेवले ते सुभाष खोये यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम, व्ही.एन.जी. रोड ते बोधना नदी रस्त्यावर पांदण रस्ता भुमीपुजन, सार्वजनिक वाचनालय इमारत बांधकाम, मनरेगा अंतर्गत सिमेंट रस्ता, मच्छगंधा सोसायटी ते सचिन अष्टेकर यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम, वामन ठेंगरे ते दिलीप खेवले यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन यावेळी पार पडले.
यावेळी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, कृ.उ.बा. संचालक किशोर राऊत, कृउबा संचालक उमेश धोटे, अॅड आशिष गोंडाणे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा.डि.के.मेश्राम, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रूपेश बाणबले, अतुल राऊत, चोकेश्वर भरडकर, विजय नाकतोडे, दयाराम नाकतोडे, सुरेखा नाकतोडे, अश्विनी बुल्ले, शालीनी तोंडरे, वैशाली ठाकरे, बेबी माटे, सरपंच प्रीतम बाबनवाडे, दिनकर चुधरी, विठ्ठल किनेकर, अनिल कामडी, सरपंच वनश्री शेंडे, विलास राऊत, नरेश निकोडे, राकेश खरकाटे, आशिष राऊत, दिलीप ठाकरे, रेवनाथ ठाकरे, साजन लिंगायत, युगल नागदेवते, भास्कर गोटेफोडे, वसंत बगमारे, ओमदेव ठाकरे, माधुरी ढोंगे, संध्या गुरनुले, समीर मैंद यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.