वरोरा येथील इंद्रप्रस्थ नगरीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

152

 

 

वरोरा:अनेक संस्कृतीमध्ये झाडे आदरणीय व पवित्र मानले जाते. आपल्या देशात झाडांची पुजा केली जातात. मात्र शहरीकरणाच्या झपाट्यामुळे दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात पर्यावरणात उष्ण तापमान वाढलेले. याची प्रचिती नागरीकांना जानवत आहे तसेच आज माणूस फक्त अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या मागे आपले आयुष्य व्यतीत करतो परंतु पर्यावरण हा मुख्य घटक सध्या तो विसरून चाललेला आहे.
त्यामुळे फक्त झाडे लावणे हा फक्त उद्देश नसून ती कशी जगवता यावी या गोष्टीकडे लक्ष देऊन या संकल्पनेतुन आज
वरोरा शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील पर्यावरण प्रेमी राजु हिवंज व कमलाकर डुकरे यांनी पुढाकार घेऊन तेथील स्थानिक सावर्जिनक हनुमान मंदिर परिसरात निसर्ग सौंदर्य असलेले ७२ ” वटवृक्ष, पिंपळ, कडुनिंब, कोनोकार्पस, टर्मिलीया” या वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मागील तीन वर्षांपूर्वी सुध्दा अशाच वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी सुद्धा ६२ वृक्षांची लागवड केली विशेष म्हणजे आज त्या वृक्षांची उंची चाळीस फुट अधिक आहे.
पर्यावरण प्रेमी राजु हिवंज व कमलाकर डुकरे यांचे कौतुकास्पद व स्तुत्य वृक्षारोपणाचा उपक्रम राबविल्या बद्दल तेथील स्थानिक रहिवासीनी कौतुक केले. यावेळी हनुमान मंदीराचे संचालक मंडळ व स्थानिक रहिवासी इंद्रप्रस्थ नगरीला स्वच्छ सौंदर्य संपन्न व हिरवीगार करण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी  श्री हलगे, श्री दुर्गे, श्री जांभुळकर, श्री वाकडे, श्री ढवस, श्री राजु तांबेकर, श्री मोरे, श्री उमकु, श्री पोटे, श्री पर्बत, श्री काकडे, श्री बावने, श्री दारारकर, श्री किलनाके, श्री घुघल, श्री डुडूरे, श्री सेलोकर, यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमास  सहकार्य केले.    तसेच इंद्रप्रस्थ नगरीतील  सर्व पुरुष व महिला मंडळी व युवक – युवती  यांचे अमुल्य असे सहकार्य लाभले.