माना समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते गुलाब डोंगरू हनवते यांनी नुकताच काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे सुरू असुन ब्रम्हपुरीची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू आहे. येत्या काळात विकसित शहर म्हणून ब्रम्हपूरी पुढे येणार आहे. हे सर्व राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नामुळे होत आहे.
त्यामुळे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केलेल्या विकासकामांवर व त्यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी येथील माना समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते गुलाब हनवते यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे काॅंग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतीश वारजुरकर, जिल्हा काॅंग्रेस कमेटीचे सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, न.प. माजी उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
#पुष्पाकर बांगरे यांची शहर काँग्रेस सचिवपदी नियुक्ती
ब्रम्हपूरी येथील सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पुष्पाकर बांगरे यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यानंतर जोमाने पक्षसंघटनेचे काम सुरू केले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पाकर बांगरे यांची ब्रम्हपूरी शहर काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.