रुद्रापुर- कवठी – पारडी मार्गांवर बससेवा सुरु करण्यासाठी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे निवेदन..

821

सावली ( तालुका प्रतिनिधी ) :- तालुक्यातील रुद्रापुर- कवठी- पारडी या गावातील वि‌द्यार्थी-वि‌द्यार्थिनी शिक्षण घेण्याकरिता तसेच या परिसरातील नागरिक तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामाप्रसंगी रोज सायकल किंवा पायदळ जाणे येणे करीत असतात. परंतू हा परिसर जंगलव्याप्त असल्याने सावली कवठी मार्गे वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढलेला आहे, काल दि. 16 जुलै 2024 ला शाळकरी मुली शाळेत जात असताना रानटी डुकराने हल्ला केला या हल्ल्यात कवठी येथील तिन वि‌द्यार्थिनी जखमी झाल्या असून ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती आहेत.

याआधी बस सेवा संदर्भात दि 15 जुलै 2024 ला राज्याचे विरोधी पक्षनेता मा.ना. विजयभाऊ वड्डेटिवार हे सावली तालुका दौरावर असताना ह्याबाबत सांगण्यात आले होते व त्यांनी होकार सुद्धा दिला आणि दुसऱ्याच दिवशी 16 तारखेलाच अशी घटना घडली. त्यामुळे अशी दुर्घटना पुन्हा घडू नये याकरिता शालेय विद्यार्थी व नागरिकाकरिता बस सेवा सुरू करावी ह्या करिता सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने गडचिरोली आगार प्रमुख श्री.फाल्गुन राखडे यांना संबंधित निवेदन दिलेले आहे.

याप्रसंगी माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर श्री.दिनेश पाटील चिटणुरवार,सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष मा.प्रभाकरजी वासेकर, ग्रामपंचायत कवठीचे उपसरपंच श्री.राकेश घोटेकर आदी उपस्थित होते.