सावली ( तालुका प्रतिनिधी ) :- ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे नेते संदीप गड्डमवार हे निवडणूक लढणार का? अशा प्रश्नार्थक बातम्या काही वृतपत्रात प्रकाशित झाल्या आहेत त्याबाबत या बातम्या निरर्थक व चुकीच्या असून यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन संदीप गडमवार यांनी केले आहे.
संदीप गड्डमवार राजकारणात प्रवेश करताच जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सीट नाकारल्यामुळे अपक्ष लढले त्यात त्यांचा नगण्य मतांवर पराभव झाला पण दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. या निवडणुकीनंतर काँग्रेसने बडखोरी केल्यामुळे पक्षातून निलंबित केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून 2014 ची निवडणूक लढवली त्यात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे निवडून आले.
2019 च्या विधासभा निवडणुकीत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची जागा भाजप शिवसेना युतीत शिवसेना पक्षाकडे गेली. गड्डमवार हे शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली त्यात विजय वडेट्टीवार यांचा दुसऱ्यांदा विजय झाला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या सत्तेत विजय वडेट्टीवार मंत्री झाले.संदीप गड्डमवार यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पूर्वाश्रमीच्या काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला व वडेट्टीवार यांच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात, निवडणुकात सक्रिय सहभाग घेत आहेत.
काही कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्यावरून काही वृतपत्रात नाराज असल्याच्या, विधानसभा लढणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस सोडून विधानसभालढण्याचा प्रश्नच येत नसल्याचे बातम्याचे खंडन केले आहे.