वन कार्यालय खुले : कर्मचारी गायब : फुसे भडकले 

379

चंद्रपूर:जिल्हात वन्यजीव मानव संघर्ष टोकाला पोहचला आहे. त्यात वन्यजीवाकडून शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन्यजीव शेत पिकांकडे येणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, ही मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी आंदोलन केले होते.गोंडपिपरी तालुक्यातील सोमणपल्ली गावात रानडुक्करांचा हैदोस सुरु आहे. घरात शिरून रान डुकराने हल्ला केला. यात रामदास मडावी गंभीरित्या जखमी झालेत. तर संतोष दुर्गे यांच्या अर्धा एकर शेतातील तील कपाशी डुकराने फस्त केले. या दोघांनी फुसे यांना आपबीती सांगितली. पुसे यांनी या दोघांना घेऊन मध्ये कांदा वन विभागाचे कार्यालय गाठले. बारा वाजले असताना कार्यालयात केवळ एक वन मजूर उपस्थित होता. येथील वनपरिक्षेत्राधीकारी,वनपाल, वनरक्षक बाहेर गावावरून ये जा करीत असतात. त्यामुळे ते कधीच कार्यालयात वेळेवर हजर होत नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. वनविभागाच्या या कामचुकार धोरणावर फुसे यांनी संताप व्यक्त केला.