पोंभुर्णा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे काम बंद आंदोलन

683

पोंभुर्णा :- तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक, यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे.पोंभुर्णा तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष भालचंद बोधलकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत दिनांक 16 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलनाचा पवित्र घेतला आहे,

तीन लाखावरील कामे ग्रामपंचायतीना करता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळे विविध ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यात मोठी नाराजी पसरलेली आहे.

प्रमुख मागण्या, तीन लाखावरील सर्व कामे ग्रामपंचायतला करण्यास परवानगी द्यावी, सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या मानधनात वाढ करावी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांना राज्य शासनाने पेन्शन योजना लागू करावी, या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे, या आंदोलनाची दखल न घेतल्यास दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन केले जाणार आहे, अशी पोंभुर्णा तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष भालचंदबोधलकर प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली आहे.