Homeचंद्रपूर*अड्याळ येथे ४५ कोटींच्या विपश्यना केंद्राचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

*अड्याळ येथे ४५ कोटींच्या विपश्यना केंद्राचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

*तथागतांच्या धम्मातील माणुसकी व प्रेमभावाची शिकवण ही जगाला शांतीची दिशा देणारी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

*अड्याळ येथे ४५ कोटींच्या विपश्यना केंद्राचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांनी मानव जातीला जीवनाचा अर्थ समजवून प्रत्येक सजीवाबद्दल आपुलकीची व प्रेमाची भावना निर्माण करणारी प्रेरणा दिली. तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला समान हक्काने जगण्यासाठी संविधान दिले. या संविधानामुळेच मी आज सर्वसामान्य ते राज्याचा विरोधी पक्ष नेते म्हणून तुमची सेवा करीत असून जन्माने जरी बौद्ध नसलो तरी बुद्धांचे विचार अंगीकारून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. तथागतांच्या धम्मातील माणुसकीची व प्रेम भावाची शिकवण हीच जगाला खरी शांतीचा संदेश देणारी शिकवण होय. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ (जानी) येथे आयोजित विपश्यना केंद्र भूमिपूजन व तथागत गौतम बुद्धांच्या मुर्त्यांचे वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यातील मुख्य अतिथी म्हणून थाईलंड येथील वाट साकेत धम्म स्कुल राॅयल मठ पाली विभागाचे प्रोफेसर डॉ.फ्रामहा फोंगसाथोर्न धम्मभणी, पाली विभागाचे प्रा.फ्रामाहा सुपाचै सुयानो
तर प्रमूख अतिथी म्हणून खा.प्रणिती शिंदे, खा.बलवंत वानखेडे, खा.डॉ.नामदेव किरसान, कॅप्टन नटिकेट थाईलंड, सिने अभिनेता गगन मलिक, काॅंग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, अॅड राम मेश्राम, माजी जि.प.अध्यक्ष सतीश वारजुरकर, ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, सिंदेवाही तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, काॅंग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, मंगला लोनबले, उषा भोयर, योगिता आमले, नगराध्यक्ष स्वप्ननील कावळे, दिनेश चिटनुरवार, मोंटू पिल्लारे, डॉ.नितीन उराडे यांसह ब्रम्हपूरी, सिंदेवाही, सावली येथील काँग्रेस कमिटी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

यापुढे बोलतांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, अड्याळ जाणी येथे बांधण्यात येणारे विपश्यना केंद्र हे सर्व धर्म पंथातील नागरिकांसाठी मानवतावादी उच्च विचारांचे अधिष्ठान म्हणून येणाऱ्या काळात नावलौकिकास येणार असून ही सत्कार्य करण्याची संधी मला बाबासाहेबांच्या संविधानामुळे करता आली. बाबासाहेबांचे संविधान हे सर्वसामान्य माणसाचे कवच असुन याचे रक्षण करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. भविष्य काळात येथे जागतिक स्तरावरील धम्म परिषद घेता येईल अशा सर्व सुविधांसह प्रशस्त अशी व्यवस्था करून देण्याची मी ग्वाही देतो असे ते यावेळी म्हणाले.

मार्गदर्शनपर बोलतांना खासदार प्रणीती शिंदे म्हणाल्या की अड्याळ येथील विपश्यना केंद्र हे देशातील नावलौकिक ठरेल. सध्या देशातली मनुवादी विचारांच्या सरकारचा आरक्षण संपविण्याचा डाव असुन तो हाणून पाडण्यासाठी आपण पेटून उठले पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांमुळे आज क्रांती बघावयास मिळत आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना हा लॉलीपॉप निवडणुकी नंतर सावत्र बहीण योजना होईल असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर राज्यातील कर्तुत्ववान नेतृत्व असलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बाबासाहेबांच्या विचारांतुन प्रेरणा घेऊन जे समाजबांधवांसाठी सेवाभावी कार्य चालवले आहे यामुळे त्यांच्या पाठीशी संपूर्ण समाजाने खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन काॅंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, खासदार बळवंत वानखेडे, खासदार नामदेव किरसान यांनी केले.
याप्रसंगी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी युवा पीढीने निर्माण करण्यात येणाऱ्या विपश्यना केंद्रातुन उच्च व थोर विचार अंगिकारून उज्वल भविष्य घडवावे असे आवाहन केले.

तर सिनेअभिनेते गगन मलिक यांनी बौध्द धर्माच्या शिकवणीचे महत्व पटवून देत धम्मचक्र पुढे नेण्याचे जबाबदारीचे कार्य हे उपासकांवर असुन बौद्ध बांधवांनी आपल्या पाल्यांना भिक्षु बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा.याकरीता आम्ही स्वतः त्यांच्या थायलंड मधील शिक्षणाची जबाबदारी स्विकारु असे ते यावेळी म्हणाले.
तर यावेळी थाईलंड येथील भंतेजी डॉ.फ्रामहा सुपाचै धम्मभणी यांनी उपस्थितांच्या जिवनात सुख समृद्धी साठी तथागत गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजेश कांबळे यांनी तर सूत्रसंचालन सतीश डांगे, सुरज मेश्राम यांंनी केले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

*बाॅक्स* :- ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील विविध गावांतील बौध्द विहारांसाठी ५१ बुध्द मुर्त्यांचे वितरण करण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!