विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश; सतीश मालेकर झाडांना राखी बांधून वाचनालयात साजरा केला राखी रक्षाबंधन

364

चंद्रपूर: आज सगळीकडे वृक्षतोड होत असल्याने जागतिक तापमानात वाढ व हवामान बदलाचे नकारात्मक परिणाम वाढलेले आहे.यासाठी प्रत्येक नागरिकांनी एकतरी झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश असे प्रतिपादन शिवब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतीश मालेकर यांनी वाचनालयातील विद्यार्थ्यांना केले.

राजुरा तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आयोजित केलेल्या राखी रक्षाबंधन उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्वागत गीत व महापुरुषांचे पुस्तक भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.टाकाऊ वस्तूंपासून राखी कशी तयार करावी. तसेच राखी केवळ भावाबहिनिंमध्ये नाते,प्रेम निर्माण करणारेच नसून तर त्या राख्या वृक्षांना बांधून निसर्ग संवर्धनाचा एक नवा दृष्टिकोन समाजासमोर मांडता आला असे विद्यार्थ्यांनी बोलतांना सांगितले.राखी रक्षाबंधन या उपक्रमात एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यामध्ये लहान गटात प्रथम काव्या कमलवार,
द्वितीय रुचित बोरकर, तृतीय लावण्या निमकर तर मोठ्या गटात प्रथम डिंपल लांडे,द्वितीय साक्षी ठावरी, तृतीय विभुती जंपलवार यांनी क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना बुक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.राख्यांचे परीक्षण वनिता लाटेलवार, सोनू कमलवार, मोना जंपलवार यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कार्याबद्दल भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाला शिवब्रिगेडचे अध्यक्ष सतीश मालेकर, आनंदराव अंगलवार, बाबुराव कमलवार, सोनू कमलवार, वनिता लाटेलवार, मोणा जंपलवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे यांनी तर आभार स्वप्नील जोवतोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सागर बोरकर,प्रवीण चौधरी, श्रुती बोरकर, मयूर जानवे, प्रज्वल बोरकर,समीक्षा मोडक,प्रकाश बोरकुटे,कुणाल भोयर यांनी सहकार्य केले.