मारेगांव: येथिल सोशल मीडिया क्रियेटर विलास झट्टे हा नेहमीच आपल्या व्हिडिओ मूळ चर्चेत असतो,आणि सध्या जिल्हाभर त्याच्या पुन्हा एका कामाची प्रशंसा केली जात आहे. ते म्हणजे की, मागच्या महीन्यात 15 आगस्ट ला स्वतंत्रदिना निमितानी स्कॉलरशिप आणि नवोदयची पुस्तक वाटप केली. आज शिक्षक दिनाचे निमित्त साधून पुन्हा त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे की, मारेगाव तालुक्यातल्या प्रत्त्येक जिल्हा परिषद शाळेला स्कॉलरशिप आणि नवोदयच्या परीक्षेचे महत्व समजावून सांगून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि नवोदयचे पुस्तक वाटप सुरु केल आहे.5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे निमित्त साधून विलासनी मारेगाव तालुक्यातील पाथरी आणि चिंचाळा येथिल शाळांना सोशल मिडिया मधून मिळणाऱ्या पैष्यामधून हा उपक्रम राबला आहे तेंव्हा त्याच्या सोबात त्याचा भाउ रवी झट्टे आणि त्याचा सहकारी तन्मय सरोदे सोबत होते.