Homeचंद्रपूरसमाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने जलनगर वार्डात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने जलनगर वार्डात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन

चंद्रपूर :  स्थानिक सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर, महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. जयश्री कापसे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली विविध क्षेत्रात गांधी सप्ताहाचे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत बि.एस.डब्लु व्दितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी समुहांच्या माध्यमातून जलनगर वार्डात पाच दिवसांपूर्वी प्रथम मोफत रक्त चाचणी शिबिर आयोजित केले होते, यामध्ये ९८ लोकांची हिमोग्लोबिन, थायरॉईड, सिबीसी, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, शुगर टेस्ट, कॅन्सर मार्कर, व्हिटॅमिन बी १२, या रक्त चाचण्या हिंदलॅब च्या सहकार्याने पार पडल्या होत्या. हे रिपोर्ट्स आल्यावर या अनुषंगाने संपूर्ण नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार व्हायला हवे म्हणून सत्य साई सेवा समिती, चंद्रपूर च्या सहकार्याने आज हा शिबिर संपन्न झाला.

या शिबिरात चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ तुषार भागवत, स्री रोग तज्ञ डॉ. अडवाणी मॅडम तसेच डॉ मानसी रामटेके मॅडम यांच्या उपस्थितीत १६२ लोकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक प्रा.नितीन रामटेके, सत्यसाईबाबा सेवा समिती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री. मुनगंटीवार व इतर सर्व सहकारी तसेच या क्षेत्रकार्याचे समन्वयक प्रा डॉ किरणकुमार मनुरे व वार्डातील युवा शक्ती श्री विजय केळझरकर उपस्थित होते, ज्यांनी वार्डातील मंडळांचे सहकार्य मिळवून देऊन शिबीरासाठी आवश्यक मोठा पेंडाल तसेच सर्व साधने उपलब्ध करून दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन बि. एस. डब्लु. व्दितीय वर्षाच्या आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी व यांचे प्रतिनिधी श्री सुमित काकडे यांच्या पुढाकाराने सलोनी अतकर, वैष्णवी राजगडकर, रोषणी बद्रे, अनुश्री बोबडे, उत्कर्षा दुर्गे, प्रणाली उईके, रामेश्वरी पंदरे या सर्व विद्यार्थ्यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
जलनगर वार्डातील नागरिकांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शिबीर स्थळी येवून आपल्या आरोग्याची तपासणी व औषधोपचार घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!