वरूर रोड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर (रोड) येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी दीप करमणकर,रूचीत बोरकर,आरोही कमलवार, समृध्दी उमरे,रोहन रामटेके, काव्या कमलवार,शिवण्या करमनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते. त्यांच्या संघर्षाचा, शिक्षणाचा, आणि संविधानाच्या निर्मितीचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायक आहे.त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी, सामाजिक न्यायासाठी वाचन, शिक्षण आणि अधिकारांसाठी आयुष्य समर्पित केले.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतात बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या महत्त्वावर आणि त्यांच्या कार्यावर जोर दिलेला आहे, कारण डॉ. आंबेडकर यांचे शिक्षणासाठी अपार योगदान आहे. “शिक्षण हेच खरे बल आहे,” असे बाबासाहेब म्हणाले होते, आणि त्यांच्या या विचारांनी लाखो लोकांना प्रेरित केले.या कार्यक्रमाला ग्रामपंचायत येथील सदस्य सोनू ताई कमलवार, वनिता ताई लाटेलवार, मेघा ताई करमनकर,अश्विनी ताई तेलंग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण चौधरी यांनी केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील जीवतोडे, प्रज्वल बोरकर, मयूर जानवे, कृष्णा अत्राम,समृध्द मोडक,प्रवीण चौधरी,समीक्षा मोडक आदी विद्यार्थ्यांनी केले.