बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : परभणी येथे १० डिसेंबर २०२४ रोजी देशद्रोही समाज कंटकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा “भारतीय बौद्ध महासभा जिवती व संविधान प्रेमी” तसेच ‘राष्ट्रीय काँग्रेस तालुका जिवती’ च्या वतीने राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व पोलिस महासंचालकांना निवेदने देऊन जाहीर निषेध करण्यात आला.
भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाज कंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टरमाइंडचा शोध घेण्यात यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकर वाद्याचा मृत्यू झाला आहे. तो पीसीआर मध्ये होता.तेव्हा अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी, आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमीवर व्देष भावनेतून केले जात असलेले “कौबिग ऑपरेशन’ त्वरित थांबवावे, निर्दोष स्त्रीया, सुशिक्षित तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे व देशद्रोही समाज कंटकावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा जिल्हयासह तालुक्यातील संपूर्ण आंबेडकर अनुयायी, संविधान प्रेमी व काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहिल. असा इशाराही भारतीय बौद्ध महासभा व संविधान प्रेमी तसेच काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष, दिपक साबने, सल्लागार नभिलास भगत, भा.बौ.महासभेचे पदाधिकारी प्रदीप काळे, अमोल कांबळे, प्रल्हाद काळे, रामदास रणवीर, लिंबादास पतंगे, पंडित श्रीकांबळे, गिरीश कांबळे, देविदास साबने, बळीराम काळे, गणपत सोनकांबळे, संविधान प्रेमी कोदेपुरचे सरपंच गंगाधर आत्राम, जयराम मोरे, वैजनाथ हामपल्ले, लच्चू मडावी, सुनील शेळके, शिवदास शेळके, कृष्णा चव्हाण यांचेसह गणपत आडे, गणेश कांबळे, रामचंद्र सिडाम यांचेसह अनेक जन उपस्थित होते.