वरोरा: अठरा वर्षांखालील मुले ही समाजातील बालक या घटकात येतात. या वयातील बालके अनेकदा लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. आपल्यावर अत्याचार होत आहे हे कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यादृष्टीने विद्यार्थ्याना सजग करण्यासाठी वर्ग अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याचे मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपूर चे सचिव मा. सुमित जोशी यांनी या विषयावर Power point द्वारे अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. Pocso कायदा काय आहे? बालकाच्या सौरक्षणासाठी कायद्यात काय तरतुदी आहेत. गुन्हेगाराला शिक्षा होण्याचे प्रकार काय आहेत अशा विविध बाबीवर उदाहरणे देऊन प्रकाश टाकला. जीवना मध्ये आपले ध्येय ठरवावे व ते साध्य करण्याकरिता प्रयत्नशील असावे. त्याचप्रमाणे आपल्या वयाप्रमाणे आपली वर्तणूक कशी असावी अशा विविध बाबीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्राचार्य राधा सवाने यांनी केले तर सूत्र संचालन प्रा.निलेश जोशी, आभार प्रा.किरण लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक प्रा. वरुटकर व इतर शिक्षक उपस्थित होते