प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मारेगाव येथील सोशल मीडिया इन्फ्लुसर विलास झट्टे यांचेतर्फे शालेय भेटवस्तू वाटप

908

जळका :- मारेगाव येथील सोशल मीडिया इंफुलेंसर “साधा माणूस फेम”संपूर्ण महाराष्ट्रचा लाडका विलास झट्टे हा नेहमीच आपल्या व्हिडिओ मूळ चर्चे असतो पण त्या पलीकडे जाऊन तो समाजप्रती आपले काही देणे लागतो या विचाराला घेवून सुद्धा चर्चेत असतो.

आज २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त साधून ग्रामीण समस्या मुक्ति ट्रस्ट अंतर्गत आनंद बाल सदन जळका आणि लक्ष्मी बाई मोघे विद्यालय जळका या शाळेला भेट देवून आनंद बाल सदन जळका येथील अनाथ मुलांना रजिस्टर, पेन, पेन्सिल, शोपणर, खोड रब्बर, अश्या शालेय वस्तू चे वाटप करून त्याना मी तुम्हच्या सोबत आहो अशी ग्वाही देत प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तेव्हा तिथे शाळेचे शिक्षक वृंद , संचालक, गावकरी, आणि विलास झट्टे यांचे सहकारी तन्मय सरोदे, गणेश ठमके, हजर होते.