घोट रेगडी मार्गाचे रुंदीकरण करून नूतनीकरण करा….सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शाहा यांची मागणी…

160

चामोर्शी: तालुक्यातील रेगडी घोट या मार्गावर रहदारी मोठ्या प्रेमाने सुरू असून या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. एटापल्ली, मुलचेरा,भामरागड या तालुक्यातील नागरिक जिल्हा मुख्यालय जाण्याकरिता जवळचा मार्ग म्हणून याच मार्गाचा वापर करत असल्याचे चित्र आहे.

सध्या बहु चर्चित देवदा पुलिया चे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गावर रहदारी वाढली आहे. लॉयड मेटल सूरजागढ चे पण अधिकारी याच मार्गाने ये जा करत आहेत कंपिनीचे अनेक वाहन एटापल्ली येथून कोनसरीला जाण्या करिता हाच मार्ग वापरत आहेत.

रेगडी घोट मार्ग अरुंद असल्याने अनेकदा या मार्गावर अपघात होऊन अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन त्वरित या मार्गाची रुंदीकरण करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शाहा यांनी केली आहे.