भंगाराम तळोधितील “ज्ञानशाळेची” यंग चांदा ब्रिगेडकडून दखल

451

आ.जोरगेवारांकडून अनिकेत दुर्गेचा गौरव

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

गोंडपिपरी :-

देशावर कोरोनाचे संकट आले.अन सार काही उलथापालट झाले.यातही सामाजिक जानिवेतुन अनेक हात गरजूंसाठी राबतांना दिसले.असाच गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी गावच्या अनिकेत दुर्गे या युवकाने गावच्या विहारात चिमुकल्यासाठी “ज्ञानशाळा”सुरु केली.या कार्याचा दखल चंद्रपुरच्या “यंग चांदा ब्रिगेडने” घेतली.आ.किशोर जोरगेवार यांनी नुकतेच एका सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थि असलेल्या अनिकेतचा गौरव केला.आणि उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

कोरोनाने विषानुने सर्वत्र थैमान घातला,आणि जगण्यावर बंधने आलीत.लाॕकडाऊन सुरु झाले.शाळा,महाविद्यालयांना टाळे लागले.यावेळी समाजकार्याचा विद्यार्थि असलेला अनिकेत भंगाराम तळोधी या मुळ गावी परतला.यावेळी शाळकरी चिमुकली मुले घरच्या-घरी तर कधी गावच्या कट्यावर उनाडक्या करतांना दिसली.आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाचा उपयोग गावकर्यासाठी झाला पाहिजे,या हेतुने अनिकेतने पालकांना विश्वासात घेत गावच्या विहारात ज्ञानदानाचे कार्य सुरु केले.या उपक्रमाला पालंकासह गावकर्याचे सहकार्य मिळू लागले.अन कोरोनाच्या पाश्वभुमिवर भंगाराम तळोधित “स्कूल चले हम” चा आवाज घुमू लागाला.माध्यमातुन हा विषय चर्चिल्या गेला.अनिकेतच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.अश्यातच या उपक्रमाची दखल चंद्रपुरच्या “यंग चांदा ब्रिगेडने” घेतली.नुकतेच स्वातंत्र्य दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडकडून आयोजित सत्कार सोहळ्यात अनिकेतचा गौरव झाला.यावेळी आ.किशोर जोरगेवारांनी अनिकेतचा सत्कार करत कौतूक केले.आणि उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

—————————————-

कोरोना काळात अनिकेतने गरजूंना धान्य वाटप,सहयोगी डिजिटल एज्युकेशन प्रकल्प,सहयोगी रोजगार हमी प्रकल्प,सहयोगी शेतकरी मार्गदर्शन प्रकल्प यासह विद्यार्थ्यांना एकत्र करून बुद्धविहारात ज्ञानशाळा सुरू केली.समाजकार्याच्या ह्या विद्यार्थ्याने शिक्षण खऱ्या अर्थाने शिक्षण अमलात आणले.
————————————–

अनिकेतने भंगाराम,तळोधित सुरू केलेल्या ज्ञानशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला.अनिकेतची प्रेरणा घेत जिल्ह्यातील युवक पुढे आले.आणि आता तर ज्ञानशाळा नावाचा उपक्रम तब्बल सात गावात सुरू झाला आहे.अनिकेतने ३० विद्यार्थ्यांना एकत्र करून स्वगावी या उपक्रमाची सुरुवात केली.आज जिल्ह्यात सहाशे विद्यार्थी या उपक्रमाअंतर्गत ज्ञानार्जन करित आहेत.. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही. जिल्हा प्रतिनिधी. कैलास दुर्योधन