तहसील कार्यालय परिसरात चिखलाचे साम्राज्य

339

शासनच फसले चिखलात ?

दिपक साबने-जिवती

जिवती तालुका म्हणजे अतिदुर्गम, मागास, ग्रामीण विकासाच्या बाबतीत पिछाडीवर अशी ओळख आहे. जिवती तालुक्यातील तहसील कार्यालयाचे पटांगण हे चिखलाने माखल्याचे चित्र दिसत आहे. त्याच चिखलात महाराष्ट्र शासनाची चार चाकी च फसल्याने नागरिकांमध्ये शासनच चिखलात फसल्याची खमंग चर्चा रंगू लागली आहे. चिखलाने माखलेल्या कार्यालयाचा वाली कोण ? अशी चर्चा जनतेत सुरू आहे.
या माखलेल्या दल दल चिखलामध्ये महाराष्ट्र शासनाची गाडी फसली, ही फसलेली गाडी चिखलाबाहेर काढण्याचा प्रयत्न संबंधित कर्मचारी करत आहेत. अशी परिस्थिती तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या मुख्य गेट समोर झाली आहे. यालाच म्हणतात का “स्वच्छ भारत अभियान” कोणा व्यक्तीला स्वच्छ परिसर ठेवण्याचे धडे गिरवायचे असल्यास त्या व्यक्तीने तहसील कार्यालय परिसराला भेट द्यावी असा सूर जनतेतून केला जात आहे.