गडचिरोली जिल्ह्यात भाजपाचे घंटानाद आंदोलन

320

 

गडचिरोली / प्रशांत शाहा

विदर्भाची काही मानल्या जाणाऱ्या मारखंडा देवस्थान येथून आमदार डॉ देवराव जी होळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरवात करण्यात आली.

राज्‍य शासनाने सर्वधर्मीयांची देवालये अर्थात मंदीर, मस्‍जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे त्‍वरीत उघडावी या मागणीसाठी गडचिरोली जिल्‍हयात भाजपातर्फे आज 29 ऑगस्‍ट रोजी सकाळी 11.00 वा. विदर्भाची काशी मार्कंडेश्र्वर मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्‍यात आले
दार उघड उध्‍दवा दार उघड
अशी हाक या आंदोलनाच्‍या माध्‍यमातुन मुख्‍यमंत्र्यांना देण्‍यात आली आहे.
गेले सहा महिने संपूर्ण जग, देश, महाराष्‍ट्र कोविड-19 च्‍या महामारीचा सामना करीत आहे. लॉकडाऊननंतर राज्‍यात टप्‍प्‍या टप्‍प्‍याने अनलॉक करण्‍यास जेव्‍हा सुरूवात केली तेव्‍हा राज्‍यातील जनतेने राज्‍य शासनाने केलेल्‍या प्रत्येक आवाहनाला सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे. राज्‍य शासनाने व्‍यसनाधीन असणा-या नागरिकांची सोय व्‍हावी यादृष्‍टीने मदीरालये सुरू केली. मात्र दुसरीकडे आपले आराध्‍य, श्रद्धास्‍थानांसमोर भक्‍तीने लीन होण्‍यासाठी मंदीर, मस्‍जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे मात्र नागरिकांसाठी सुरू केली नाही. संतांची भूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात मॉल्‍स, मास, मदीरा चालू झाले मात्र सर्वधर्मीयांची देवलाये बंद आहेत. कुंभकरणापेक्षाही गाढ निद्रेत असलेल्‍या ठाकरे सरकारला जागे करण्‍यासाठी घंटानाद आंदोलन करण्‍याची वेळ येऊन ठेपली. इतर राज्‍यांमध्‍ये देवालये, प्रार्थनास्‍थळे सुरू करण्‍यात आली आहेत. मात्र हा निणर्य महाराष्‍ट्रात अंमलात आला नाही. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सावधानी बाळगण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक फलक मंदीर, मस्‍जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळांसमोर लावण्‍यात यावे व सोशल डिस्‍टन्‍सींग पाळत ती सुरू करण्‍यात यावी, अशी मागणी भाजपातर्फे करण्‍यात आली आहे.
भाजपातर्फे हे आंदोलन संपूर्ण गडचिरोली जिल्‍हयात करण्‍यात आले असून या आंदोलनात सोशल डिस्‍टन्‍सींग पाळण्‍यात आले आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघात या आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ देवराव होळी यांनी केले विधानसभा मतदार संघातील गडचिरोली तालुक्याचे नेतृत्व भाजप तालुका अध्यक्ष रमरतन गोहने व गडचिरोलीच्या नगराध्यक्षा सौ, योगिता ताई पीपरे ,भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , धानोरा तालुक्याचे भाजप तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे , धानोरा च्या नगराध्यक्षा लीनाताई साळवे ,यांनी केले या आंदोलनात विधानसभा मतदार संघातील सर्व जिल्हा भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते ,सर्व आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य , नगरसेवक ,नगरसेविका , ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच बूथ प्रमुख , गावातील प्रमुख भाजपा नेते सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर मागणी संदर्भात निवेदने, संबंधित तहसिलदार, जिल्‍हाधिकारी यांना सादर करण्‍यात आले आहे. या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व जनतेने सहभागी होत घंटानाद आंदोलन करून राज्‍य शासनाला जागे करण्याकरिता आंदोलनात भाजपाचे तालुका अध्यक्ष दिलीप चलाख ,भाजपा तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे भाजपा बंगाली आघाडी जिल्हा सुरेश शहा ,मारखंडा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गजानन भांडेकर आदी उपस्ती होते.