कुरखेडा तालुक्यात एका तरुणाला जलसमाधी

579

कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील घटना

रमेश कोरचा /कुरखेडा

कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील सती नदीवर काल २८ ऑगस्ट रोजी पुरुषोत्तम ढवळे वय वर्ष २५ हे सती नदी वरील पुलावर उभे होऊन फोन दव्हारे बोलत होते दरम्यान त्यांचा तोल जाऊन ते नदीत कोसळेल
यात त्यांचा मृत्यू झाला
त्यांची प्रेत आज सकाळी काही शेतकरींना दिसून आल्यावर त्यांनी ही माहिती कढोली येथील पोलीस पाटील यांना दिली व पोलीस पाटील यांनी या घटनेची माहिती कुरखेडा पोलीस ठाण्यात दिली
कुरखेडा पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळ गाठून प्रेताचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदना करिता कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले
पुढील तपास प्रभारी अधिकारी बाबुराव उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सिपाही लोमेश मेश्राम हे करीत आहेत.