आमदार सुभाष धोटे यांनी चढवली पाटण व शेणगांव येथील दर्गावर मोहरम निमित्त चादर

408

 

राजुरा

मोहरम ताजिया ताबूत निमित्ताने आमदार सुभाष धोटे यांनी पाठण व शेणगांव येथील दर्गाला भेट दिली. दर्गावर चादर चढवून आशिर्वाद घेतले.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले *मोहरम*’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या दिवशी हसेन आणि हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात. या बलिदानासाठी जुलूस काढला जातो. आपले राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष व विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचा मुक्त प्रकटीकरण, आचरण करणारा लोकशाही देश आहे. शांततेने आपल्या धार्मिक भावना जपण्याचा प्रत्येकांना स्वातंत्र्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी जिवती तालुका काँग्रेस अध्यक्ष गणपत आडे, माजी जि प सदस्य भिमराव पाटील मडावी, शेणगांवचे सरपंच महेश मेश्राम, माधव डोईफोडे, प्रल्हाद राठोड,भिमराव पवार, अजगर अली शेख, शंकर कांबळे,शब्बीर पठाण, ताजुद्दीन माजीद कूरेशी, महताप शेख, सिताराम मडावी, प्रभाकर उईके, वाघु उईके, शेख अन्वर, डाॅ बेग तसेच कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.