ग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे कोरोना बाधित

374

संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आव्हान

कोल्हापूर /रवि रायपुरे कार्यकारी संपादक

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा क्षेत्रातून सतत विजय संपादन करणारे लोकप्रिय व जनतेप्रती कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची कोरोना तपासणी पॉझिटिव आल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील आधार हॉस्पिटल येथे काल दिनांक 18/ 9 /2020 रोज शुक्रवार ला सायंकाळी भरती करण्यात आले आहे .आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी व जनतेनी स्वतःची काळजी घ्यावी,व लवकरात लवकर कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आव्हान केले. असले आव्हान करणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले आहेत.

माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची प्रकृती खणखणीत असून ते लवकरच कोरोना मुक्त होतील असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. आपल्या क्षेत्रात लोकप्रिय असलेले व महाराष्ट्र शासनामध्ये अनेक वेळा विविध मंत्रिपदी राहीलेले व सध्या ग्रामविकासमंत्री असलेले नामदार हसन मुश्रीफ साहेब लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊन जनसामान्यांचा आधार स्तंभ असणारे ,समाजकार्यात तसेच राजकीय क्षेत्रात अग्रणी राहण्यासाठी ते पूर्ण कोरोना मुक्त नक्कीच होतील. त्याकरिता क्षेत्रातील समस्त जनतेने त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आशा व्यक्त केली आहे.