गृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी

952

गडचिरोली प्रतिनिधी -नितेश खडसे

गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागात नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणा-या पोलीसांसोबत दिवाळी साजरी करून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जवानांचे मनोबल  वाढविले. नामदार देशमुख यांनी  सपत्नीक शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

शनिवारी दुपारी अडीच वाजतच्या सुमारास अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरती हेलीकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. या वेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते.


गडचिरोली पोलीस क्षेत्राचे उपमहानिरिक्षक संदीप पाटील म्हणाले या ठिकाणी कार्यरत असणा-या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था बराकमध्ये केली आहे, त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत राहता येत नाही. गृहमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देत पोलीसांच्या इतर अडचणी समजून घेत सरकार सदैव पेलीस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.