किशोर चलाख यांची अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या नागपूर विभागीय अध्यक्ष पदी निवड

353

-प्रमोद दुर्गे

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या नागपूर विभागीय अध्यक्ष पदी किशोर बळीराम चलाख यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी असून या मंडळाद्वारे आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले.
किशोर बळीराम चलाख यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. किशोर चलाख हे जिल्हा परिषद चंद्रपूर येथे प्राथमिक शिक्षक असून उत्तम कवी, लेखक ग्राफिक्सकार,परीक्षक म्हणून प्रसिद्ध आहे.सोबतच उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक,दैनिक रयतेचा वाली या डिजिटल शैक्षणिक दैनिकासाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य करीत आहे. मासिक दिवाळी अंक ,साप्ताहिक वर्तमानपत्र यामध्ये त्यांचे अनेक लेख व कविता प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत.