HomeBreaking Newsचंद्रपूर; गेल्या २४ तासात जिल्ह्यात 63 नव्याने पॉझिटिव्ह ; 80 कोरोनामुक्त

चंद्रपूर; गेल्या २४ तासात जिल्ह्यात 63 नव्याने पॉझिटिव्ह ; 80 कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून 63 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर 80 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 755 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 729 झाली आहे. सध्या एक हजार 727 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 49 हजार 782 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 26 हजार 720 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितांमध्ये भटारा ता. वरोरा येथील 65 वर्षीय पुरूष, कोहापरा ता. राजुरा येथील 75 वर्षीय महिला तसेच ब्रह्मपुरी येथील 38 वर्षीय पुरूष व 78 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 299 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 276, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!