पंचगव्हाण परिसरात कपाशीवर बोंड अळी; पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

555

संघपाल गवारगुरु
जिल्हा प्रतिनिधी अकोला

तेल्हारा तालुक्यातील
पंचगव्हाण परिसरात कपाशीवर बोंड अळी आल्याने आता शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे. पावसाच्या अस्मानी संकटाने या परिसरात पावसाळ्यात अति दृष्टीने कापूस,मुंग,सोयाबीन,उडीद आदी पिकांवर फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा वाली कोण आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तेव्हा त्यांनी कपाशी या पिकाला जमा केलेला पैसा आतापर्यंत लावला परंतु मेहनत केल्यावर सुद्धा रोगराईच्या झालेल्या आक्रमणामुळे आता जगावे की मरावे असे झाले आहे.
पंचगव्हाण हे खार पण पट्ट्या चा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात शेतीशिवाय कोणतेही उद्योग दिले नाहीत. या भागातील शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून ओळखला जातो. बोंड अळी मुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानामुळे प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यास आधार देण्याची गरज आहे. शासनाच्या शेतकरी विषयक धोरणाकडे होणाऱ्या मदतीची अपेक्षा कडे वाट बघत असून शेतकऱ्यांची स्थिती खूपच हलाखीची झाले आहे. बोंड अळीच्या सर्वे करून आर्थिक मदत प्रशासनाने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तरी याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन हा सर्वे करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी ही विनंती.