जुनोना तलाव स्वच्छता साठी सरसावले कर्मचारी-ग्रामस्थ; जुनोना ग्रामपंचायत व इको-प्रो चा सहभाग

385

चंद्रपूर: जुनोना तलाव स्वछता करिता ग्रामस्थांचा सहभाग घेत जिल्हा परिषदेच्या चंद्रपूर पंचायत समितीने आपल्या विविध विभागाच्या कर्मचारी, जुनोना ग्रामपंचायत व गावातील बचतगट महिला व इको-प्रो सदस्य मिळून शेकडो हातानी मिळून श्रमदान केले.

जुनोना तलाव परिसरात येणारे स्थानिक पर्यटक, तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जेवणाच्या पार्ट्या आणि त्यातून निर्माण होणारा प्लास्टिक कचरा यामुळे निसर्गरम्य परिसर पूर्णतः प्रदूषित असतो. यामुळे चंद्रपूर पंचायत समितीने आपल्या विविध विभागाच्या कर्मचारी यांना घेऊन श्रमदानाचा निर्णय घेतला. या उपक्रमात बीडीओ विजय पेंदाम यांच्या नेतृत्वात जुनोना ग्रामपंचायत, पंचायत समितीचे सर्व विभाग, गावातील बचतगट व इको-प्रो संस्थेचे कार्यक्रते सहभागी झाले होते.

जुनोना तलाव परिसरातील प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक ग्लास, युज अँड थ्रो प्लेट, प्लास्टिक चे खाद्य पदार्थ चे वेष्टन आदी कचरा मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आला. या उपक्रमात प्रामुख्याने विजय पेंदाम, गट विकास अधिकारी, अर्शिया शेख, गट समन्वयक, समाधान भसारकर, गट शिक्षणाधिकारी, वनिता कळमकर, राजकन्या ताकसांडे, श्री नैताम, श्री शेंडे, श्री नाईक, सौ मेघा बलकी, भास्कर येनूरकर, शुभांगी पिंगे, श्री तेलंग, श्री पोटे, जुनोना ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, बचतगट महिला व इको-प्रो सदस्य अशी शेकडोच्या संख्येने नागरिक जमून श्रमदान करण्यात आले.